Marathi Kavita
स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही तेव्हा…
मी विचारतो आरशातल्या प्रतिबिंबालाच माझा परिचय.
आरसाही म्हणतो कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय खरं..अनेक वर्षांपूर्वी.
पण आता कसलातरी थर चढल्यासारखा वाटतोय चेहर्यावर…
मी खरवडून काढू पाहतो पुन्हा पुन्हा चेहर्यावरचा संधीसाधूपणाचा मुखवटा, स्वार्थाची पुटं,
आणि उगाचच होतो रक्तबंबाळ..!
मग आरसा हसून म्हणतो,
“तू स्वतःलाच बघत आलास माझ्यात वर्षानुवर्ष, बुडून राहिलास आपल्याच कैफ़ात..
आता चेहरा खरवडणं जमत नसेल तर निदान माझ्या अंगावरचा वर्ख तरी खरवडून टाक.
मग मीही होईन पारदर्शी,
माझ्यातून आरपार जग दिसेल तुला,
आणि त्या जगातल्याच कुणाच्यातरी डोळ्यात तुला दिसेल तुझा खराखुरा चेहरा..!”
Ek diwas hota ki aamhi faqt khelaycho..
Ani ek diwas hota ki aamhi shalechya gappa maraycho..
ek diwas hota ki aamhi abhyas karaaycho..
ani ek diwas hota ki aamhi college la jayacho..
Ek diwas hota ki aamhi tawalki karat firyacho..
Ani ek diwas hota ki aamhi graduate jhalo....
ek diwas hota ki aamhi master degree ghetli..
Ani ek diwas hota ki aamhi naukri shodhat firaycho..
ek diwas hota ki aamhi khup paise kamvaychya goshti karayahco..
Ani ek diwas aala ki aaj aamchyakade sagle kahi aahe....paise, gadi, bangla..
Ek diwas mag prashna padla ki "to hach ek diwas" aahe ka jyachi aapan vat baghat hoto?..
आठवून पाहायचो मी काही
आठवून पाहायचो मी काही
पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत
भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .
आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .
जाणवायची नकळत मग ती बोचरी
थंडी
गुलाबी स्वप्नातून
जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व
शोधणारी. . .
आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची
प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर
लोटलेली. . .
दाटलेलं धुकं मग सावकाश
पाझरायचं
ओल्या होवून जायच्या
तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार
थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी
गोठलेली "पापणी
Comments
0 Responses to "Marathi Kavita"